Ajit Pawar : मराठा आंदोलकांचा अजित पवारांनी घेतला धसका! गाव बंदी असल्यामुळे माळेगाव कारखान्यावर आलेच नाहीत…


Ajit Pawar : राज्यात सर्वत्र मराठा समाजाकडून आंदोलन सुरु आहे. राजकीय नेत्यांना सर्वत्र गावबंदी केली जात आहे. राज्यातील अनेक गावांनी हा निर्णय घेतला आहे. या गावबंदीच्या निर्णयाचा फटका राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना बसला आहे. Ajit Pawar

अजित पवार शनिवारी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करणार होते. परंतु गावबंदीच्या निर्णयामुळे त्यांनी या कार्यक्रमास जाणे टाळले आहे. सकल मराठा समाजाकडून अजित पवार यांनी गावात येऊ नये, अशी भूमिका घेतली होती.

तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना येऊ न देण्याचा निर्धार मराठा समाजाने केला आहे. यामुळे वातावरण तापले आहे. यामुळे आज याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार होता. परंतु राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन राजकीय नेत्यांना गावबंदी असल्यामुळे माळेगावात अजित पवार यांनी कार्यक्रमास न जाण्याचा निर्णय घेतला. आपल्याऐवजी एखाद्या शेतकऱ्यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करा, असा निरोप अजित पवार यांनी कारखान्याच्या चेअरमन यांना पाठवल्याची माहिती आहे.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या समाज बांधावाना मात्र अद्याप या बाबत शंका असल्याने मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव कार्यक्रमाच्या ठिकाणी ठिय्या देऊन बसले आहेत.

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना जोपर्यंत कारखाना प्रशासनाकडून अधिकृतरीत्या सांगितले जात नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!