Onion Rate : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अच्छे दिन! कांदा महागला, ५० रुपये मिळतोय भाव, बळीराजाला दिलासा…


Onion Rate : सणासुदीचा हंगाम सुरू होताच सर्वसामान्यांसाठी एक झटका देणारी बातमी समोर आली आहे. महागाईने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. Onion Rate

विशेषत: कांद्याचे भाव भडकले आहेत. ३० ते ३५ रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता ४५ रुपयांच्या पुढे गेला आहे. आंध्र प्रदेशात एक किलो कांद्याचा भाव ५० रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच त्याची किंमत किलोमागे २० रुपयांनी वाढली आहे.

येत्या काही दिवसांत त्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत कांद्याच्या भावाने पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवली आहे.आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये कांदा ५० रुपये किलोने विकला जात आहे, तर रायथू बाजारात कांद्याचा भाव ४० रुपये किलो आहे.

त्याचबरोबर यंदा मान्सूनचे आगमन लांबल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत कांदा पिकावरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळेच नवीन कांद्याचे उत्पादन अद्याप बाजारात पुरेशा प्रमाणात आलेले नाही. त्यामुळे भाव वाढले आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, संपूर्ण आंध्र प्रदेशात कर्नाटकातील रानुल आणि बेल्लारी येथून कांद्याचा पुरवठा केला जातो. परंतु, या दोन्ही ठिकाणांहून कांद्याचा पुरवठा गरजेपेक्षा कमी आहे.

त्यामुळे आंध्र प्रदेशात कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत येथील व्यापारी महाराष्ट्रातून कांदा खरेदी करत आहेत. यामुळेच वाढत्या खर्चामुळे कांद्याचे दर वाढत आहेत. अशाप्रकारे आंध्र प्रदेशात दररोज ६०० टन कांद्याची आवक होते.

यावेळी उशिरा झालेल्या पावसामुळे कांदा लागवडीलाही सुमारे १२० दिवस उशीर झाला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारात नवीन कांद्याची आवक सुरू होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यानंतर कांद्याच्या दरात काहीशी घसरण होऊ शकते. मात्र, यासाठी लोकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!