Rohit Sharma : भारत-बांग्‍लादेश सामन्यापूर्वीच रोहित शर्मावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई, कारणही आलं समोर


Rohit Sharma : वर्ल्डकप २०२३ स्पर्धा सुरू असताना भारतीय कर्णधार रोहित शर्माबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मावर पुणे पोलिसांची कडक कारवाई केली आहे. Rohit Sharma

भारतीय संघाचा वर्ल्डकप स्पर्धेतील पुढील सामना बांगलादेश संघाविरूद्ध रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ पुण्यात दाखल झाला आहे. दरम्यान या सामन्यासाठी पुण्याच्या दिशेने जात असताना गाडी पळवणं रोहित शर्माला महागात पडलं आहे. Rohit Sharma

टीम इंडियाचा शनिवारी (ता . १४) अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना झाला, त्यानंतर रोहित शर्मा दोन दिवसांसाठी मुंबईत आला. मुंबईहून पुण्याला जात असताना रोहित शर्मा ताशी २०० किमीपेक्षा जास्त वेगाने कार चालवत होता.

मुंबई-पुणे महामार्गावर २०० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने आपली आलिशान कार चालवणे हिटमॅनला महागात पडले आहे, त्यामुळे त्याला तीन चालान बजावण्यात आले.

एका प्रसिद्ध वृत्तपत्रानुसार, रोहित शर्माने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून आपल्या आलिशान कार लॅम्बोर्गिनी उरूसमधून मुंबई ते पुणे प्रवास केला. महामार्गावर ताशी १०० किमी वेगाची मर्यादा आहे, परंतु भारतीय कर्णधाराने ताशी २०० किमीपेक्षा जास्त वेगाने कार चालवली. वाहतूक अधिकाऱ्यांमार्फत अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. रोहित शर्माने वाहतुकीचे नियम मोडले असल्याचे पुढे सांगण्यात आले.

जोरात गाडी चालवल्यामुळे रोहित शर्माच्या गाडीवर ऑनलाइन पावती करण्यात आली, तीन वेळा त्याने एकच चूक केली. काही वेळा रोहित शर्माच्या कारचा वेग ताशी २१५ किमी होता असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

दरम्यान, वाहतूक विभागाच्या एका सुत्राने म्हटले की,’ वर्ल्डकप सुरू असताना रोहितचं महामार्गावर गाडी चालवणं ठिक नाही, त्याने टीम बससोबत प्रवास करायला हवा. तसेच पोलिसांची गाडी सोबत असणं गरजेचं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!