Ambabai Mandir : अंबाबाईला तिरुपती देवस्थानकडून मानाचा शालू अर्पण, गेल्या वर्षांपासूनची परंपरा कायम…


Ambabai Mandir कोल्हापूर : सध्या नवरात्रोत्सव सुरू असून याचा उत्साह सगळीकडे बघायला मिळत आहे. असे असताना तिरुपती देवस्थाकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला शालू अर्पण करण्यात येतो. आज (बुधवार) (दि. १८) तिरुपती देवस्थानचे पदाधिकारी, महाराष्ट्राचे देवस्थान प्रतिनिधी मिलिंद नार्वेकर शालू घेऊन दाखल झाले. Ambabai Mandir

देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी हा शालू स्वीकारला. केशरी रंगाचा सोनेरी काठ पदर असलेला हा शालू आहे. त्याची किंमत एक लाख सहा हजार ५७५ रुपये इतकी आहे. हा मानाचा शालू असून याचा इतिहास आहे.

दरम्यान, तिरुपतीवरून करवीर निवासिनी अंबाबाईला प्रतिवर्षी मानाचा शालू पाठवण्याची एक प्रथा आहे. ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये खंड पडत नाही.Ambabai Mandir

त्यानुसार यावर्षी सुद्धा तिरुपतीवरून आलेला मानाचा शालू आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, धनाजी जाधव, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नर्लेकर उपस्थित होते.

यावेळी याचे पूजन करण्यात आले. पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे हा सोहळा पार पडल्यानंतर आई अंबाबाईला हा शालू अर्पण करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविक देखील उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून तिरुमला तिरुपती देवस्थानकडून आई अंबाबाई ला शालू पाठवण्याची प्रथा आहे. ही प्रथा कायम राहिली याचा आनंद उपस्थित लोकांनी बोलून दाखवला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!