Maratha Reservation : मराठा आरक्षणाला पहिले यश? मनोज जरांगे यांची सभा झाली अन् सरकार हादरले, आरक्षणावर सूचक ट्विट…


Maratha Reservation  जालना : आज जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाचे उपोषकर्ते मनोज जरांगे यांची सभा झाली. सभेला मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने गर्दी केली होती. Maratha Reservation

या विराट सभेतून मनोज जरांगेंनी सरकारला शेवटचे दहा दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. मनोज जरांगेंच्या या आक्रमक भाषणानंतर भापने देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्वीट करत सूचक वक्तव्य केले आहे. Maratha Reservation

भाजपाने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मराठ्यांची मागणी योग्य आहे. आम्ही सत्तेत होतो त्यावेळी मराठ्यांना आरक्षण दिले होते. ते हायकोर्टाने वैध देखील ठरवले. परंतु सुप्रीम कोर्टात ते शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकारच्या काळात टिकू शकले नाही. पण भारतीय जनता पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबध्द आहे.

मनोज जरांगे यांचे आक्रमक भाषण संपताच भाजपाने केलेल्या ट्विटची सर्वत्र चर्चा रंगली आहे. राज्य सरकारने काही लोकांच्या मदतीने आंदोलन दडपण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे जरांगे यांच्यासह मराठा आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

मनोज जरांगेने सध्या मराठा आरक्षणासाठी रान उठलले आहे. मराठा आरक्षण आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसत आहे.मराठा आरक्षणामुळे ओबीसीआणि मराठा समाज आमने सामने आला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर उभा राहिल्याने भाजपच्या पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी घालून दिलेली मर्यादा ओलांडण्यासाठी घटनादुरूस्ती करणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी पाहायला मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!