Sikkim Flood : सिक्कीम येथील पुरतील मृतांचा आकडा ६५ वर, जखमींवर उपचार सुरू, मदतकार्याला वेग…

Sikkim Flood सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुरामुळे हाहाकार सुरु आहे. तसेच यावेळी मृतांचा आकडा ६५ वर पोहोचला आहे. सिक्कीम राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष (एसएसडीएमए) आणि जलपाईगुडी पोलिसांनी सांगितले की, सिक्कीममधून ३० आणि पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमधून ३५ मृतदेह सापडले आहेत. ८१ जण अजूनही बेपत्ता आहेत. २६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

SSDMA नुसार, शनिवारी सिक्कीममध्ये आणखी चार मृतदेह सापडल्यानंतर सिक्कीममधील मृतांची संख्या ३० वर पोहोचली. अजूनही ८१ जण बेपत्ता असून शोध मोहीम सुरू आहे. Sikkim Flood
शनिवारी जारी केलेल्या ताज्या बुलेटिनमध्ये, SSDMA ने म्हटले आहे की चार जिल्ह्यांतील ८६ भागात राहणारे ४१,८७० लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. १५०७ घरांचे नुकसान झाले आहे.

आतापर्यंत २५६३2 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. सध्या राज्यातील एकूण ३० मदत छावण्यांमध्ये ७,०२५ लोक राहत आहेत. पुरात १३ पूल कोसळले आहेत.
सिक्कीममधील पुराचा फटका भारतीय लष्कराच्या जवानांनाही बसला आहे. तीस्ता बॅरेजच्या खालच्या भागात बेपत्ता झालेल्या सैन्य दलातील सात जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर १५ सैनिकांचा अद्याप शोध सुरू आहे.
सिंगतामजवळील बुरडांग येथे लष्कराकडून बचावकार्य राबवलं जात आहेत. तिरंगा माउंटन रेस्क्यू (TMR), लष्कराशी संबंधित संस्था, श्वान पथक आणि विशेष रडारची अतिरिक्त टीम शोध मोहिमेत मदत करण्यात गुंतले आहेत.