Accident News : चालकाचे नियंत्रण सुटले अन् खाजगी बस कोसळली ५० फूट खोल दरीत, भीषण अपघातात चालकाच मृत्यू

Accident News : सध्या एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आह. भोरच्या वरंधा घाटात मिनी बसला भीषण अपघात झाला आहे. ही बस जवळपास ५० फूट खोल दरीत कोसळली आणि या अपघातामध्ये बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.
चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटर येथे बस खोल दरीत कोसळली. या बसमधून १० प्रवासी प्रवास करत होते. या प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. ही बस झाडाझुडपात अडकल्याने मोठा अनर्थ टळला.
स्थानिक लोकांनी जीवाची बाजी लावून प्रवाशांचा जीव वाचवला. या अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. Accident News
सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. ही बस पुण्याहून भोर मार्गे कोकणात जात होती. दरम्यान, दररोज कुठे ना कुठे अपघात होत असल्याचे आपण ऐकतच आहोत.
दरम्यान, ज्या ठिकाणी ही बस कोसळली त्या ठिकाणाहून अवघ्या ५ फुटांवर देवघर धरणाचा खोल पाणी होतं. मात्र बस झाडाझुडपात अडकल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.