शासन आपल्या दारी नव्हे तर शासन आपल्या गावी ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी घोषणा…!


नगर : सरकारी दाखले मिळण्यासाठी नागरिकांची होणारी वणवण कमी व्हावी आणि हे दाखले  त्यांना गावातच उपलब्ध व्हावेत, यासाठी महसूल विभागातर्फे शासन आपल्या दारी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सरकारी अधिकारी गावागावांत शिबिरे घेऊन दाखल्यांचे वाटप करणार आहेत, अशी माहिती महसूलमंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

येत्या पंधरा दिवसांत अहमदनगर जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांत ही मोहीम राबविण्याच्या सूचना विखे पाटील यांनी दिल्या आहेत. सरकारी कार्यालयांमधून आवश्­यक असलेल्­या सर्व योजनांसाठीचे कागदपत्र, दाखले नागरिकांना सहज सोप्­या पध्­दतीने उप­लब्­ध व्­हावेत, म्­हणून सर्व तालुक्­यांमध्­ये शासन आपल्­या दारी हा कार्यक्रम सुरू करण्­यात येणार आहे. या माध्­यमातून जनतेच्­या समस्­याही जाणून घेण्­याच्­या सूचना महसूल विभागातील अधिका-यांना दिल्­या आहेत.

महसूल विभागातून आवश्­यक असलेले दाखले मिळण्­यास बहुतांशी वेळा विलंब होतो. योजनेचा लाभ घेण्­यासाठी आवश्­यक असलेल्­या कागपत्रांमध्­ये त्रृटीही असतात. त्­यामुळे सामान्­य माणसाला योजनेच्­या लाभापासून वंचित राहावे लागते. शाळा, महाविद्यालयांच्­या कामकाजासाठी आवश्­यक असलेल्­या दाखल्­यांकरिताही विद्यार्थ्यांना निर्माण होणा-या अडचणी प्रवेशापूर्वी दूर व्­हाव्­यात, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्­यक असलेले कागदपत्र नागरिकांना सहज उपलब्­ध व्­हावेत हा या मागील उद्देश आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

गावागावांमध्ये उपक्रम शिबिर

गावांमध्­ये या उपक्रमाचे शिबिर आयोजित करण्यापूर्वी नागरिकांना माहिती कळवावी, तसेच म­हसूल विभागातील सर्व योजनांचे स्­वतंत्र विभाग करून नागरिकांचे अर्ज दाखल करुन त्­यांच्­या समस्­या जाणून घ्­याव्­यात, अशा सूचना अधिका-यांना दिल्या आहेत, असे विखे म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!