Daund : दौंड बिजगुणन केंद्राची १० एकर जमीन क्रिडा संकुल व नाट्यगृह केंद्रासाठी हस्तांतरीत! संकुलास साडे नऊ कोटींचा निधी मंजूर …!


Daund दौंड : दौंड तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक दौंड (Daund) येथे आमदार राहुल कुल  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दौंड क्रीडा संकुल व नाट्यगृहासाठी कृषी विभागाकडील बीजगुणन केंद्राची १० एकर जागा महसूल विभागाकडे हस्तांतरित करून घेण्यात यश आले. (Daund)

जागेचा प्रश्न सोडवणून या संकुलासाठी सुमारे ९.५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळवली असून पैकी संरक्षक भिंत बांधकाम करण्यासाठी सुमारे १ कोटी ५० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला असून संरक्षण भिंतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

पुढील टप्यामध्ये क्रीडा संकुलाच्या जागेचे समतलीकरण करणे, ४०० मीटरचा रनिंग ट्रॅक, कबड्डी, खो – खो, व्हॉलीबॉल, लॉन टेनिस व बास्केटबॉल आदी खेळांसाठी आवश्य मैदाने व सुविधा तयार करण्याचे नियोजन असून त्यासाठी सुमारे २ कोटी रुपयांच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली.

यावेळी सदर अंदाजपत्रक तयार करून लवकरच कामाला सुरुवात करता यावी यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, मैदानाचा आराखडा करताना पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा, खेळाडूंना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीस तहसीलदार तथा समितीचे कार्याध्यक्ष अरुण शेलार, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहय्यक अभियंता (श्रेणी – १) मयूर सोनवणे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, महावितरणचे उपभियंता चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संजय महाजन आदी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!