Maharashtra Politics : अखेर तो दिवस उजाडला! शिंदे गट की ठाकरे गट? कोणाचे आमदार अपात्र होणार, आजपासून होणार सुनावणी


Maharashtra Politics मुंबई : शिवसेनेतील अपात्र आमदारांच्या नोटीसबाबत मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना आज (ता.१४) गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिल्या आहेत. अशी माहिती ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. (Maharashtra Politics)

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणावर आजपासून सुनावणीला सुरुवात होणार (Maharashtra Politics )असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी १२ वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

या सुनावणीसाठी ठाकरे गटाने मोठी रणनीती आखली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. आज होणाऱ्या सुनावणीला कसं सामोरे जायच याबाबत ठाकरे गटाकडून नियोजन देखील करण्यात आल आहे.

या सुनावणीला सुरुवात होण्याआधी ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक देखील मुंबईमध्ये बोलवण्यात आली आह. विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुंबईतील कार्यालयात ही बैठक होणार आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narveka) rयांनी आमदारांना आपले म्हणण्याचे मांडण्यास सांगितले तरच ठाकरे गटाचे आमदार स्वतः आपली भूमिका मांडतील. त्यामुळे आता या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे की ठाकरे कोणाचे आमदार अपात्र ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!