सोन्या चांदीच्या किमतींचा पारा चढला, आजच्या भावाने केला उच्चांक, जाणून घ्या दर


नवी दिल्ली : आज भारतीय सराफा बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ नोंदवण्यात आलेली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीने मोठी उसळी घेतली आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्यात एकूण ११० रुपयांची वाढ झाली आहे .त्यामुळे आता ग्राहकांना याचा फटका सहन करावा लागणार आहे.

तर १ सप्टेंबर रोजी चांदीच्या किंमतीत ५०० रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ७७,६०० रुपये इतका आहे. तसेच २४ कॅरेट सोने ५९,४८५ रुपये, २३ कॅरेट सोने ५९,२४७ रुपये, २२ कॅरेट सोने ५४,४८८ रुपये, १८ कॅरेट ४४६१४ रुपये, १४ कॅरेट सोने ३४,७९९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. चांदीचे दर ७४,६४५ रुपये आहेत.

आता तुम्हाला जर सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक ॲप तयार केले आहे. तुम्ही बीआयएस केअर ॲपद्वारे सोन्याची शुद्धता जाणून घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अॅपद्वारे तुम्ही फक्त सोन्याची शुद्धता नाही, तर त्याच्याशी निगडित कोणतीही तक्रारही करू शकता.

दरम्यान. आता तुम्ही २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन जाणून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला लगेचच एसएमएसद्वारे सोन्याचे दर प्राप्त होतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!