गोवा – मुंबई महामार्गावर झालेल्या दुहेरी अपघातात 22 ठार…!

कणकवली : गोवा – मुंबई महामार्गावर रायगड आणि कणकवली मध्ये आज पहाटे भीषण अपघात घडला असून या दुहेरी अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. कणकवलीजवळ बस उलटून 13 प्रवाशी ठार झाले तर रायगडमध्ये कार-ट्रकच्या धडकेत 9 जणांनी जीव गमावला.

गोवा-मुंबई महामार्गावर कणकवलीजवळ खासगी बसचा ब्रेक अचानक फेल झाला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे झालेल्या अपघातात 13 प्रवाशी ठार, तर 23 जण जखमी झाले आहेत. बसमध्ये 36 प्रवासी होते. बस उलटल्याने 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर, 23 जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर 9 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरच आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात एकूण 9 प्रवाशी ठार झाले आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. तसेच, 4 वर्षीय मुलाचाही समावेश आहे
