पुणे पोलीस दलात ८५० नव्या जागा भरणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पुण्यातील पहिल्या भेटीत घोषणा..

पुणे : पुण्यात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली आहे. योगेश कदम यांनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक घेत शहरातली कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

त्यानंतर बोलताना त्यांनी पुणे पोलीस दलात ८५० नव्या जागा भरणार असल्याची माहिती दिली आहे. पुण्यातील पहिल्या भेटीत गृहराज्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. यावेळी बोलताना योगेश कदम म्हणाले, पदभार स्वीकारला तेव्हापासून पुण्यात आज माझा पहिला दौरा आहे.
पुणे आयुक्तालयाच्या मी आज आढावा घेतला. १०० दिवसाच्या प्लॅनची अंमलबजावणी कशी केली जात आहे, याचा आढावा घेतला. पुणे पोलीस प्रशासनाला शासनाकडून काही अपेक्षा आहेत. दरवेळेला आम्ही सूचना करत असतो.

परंतु, पोलीस कमिशनर असतील त्यांची सर्व टीम असेल त्यांना प्रशासनाकडून शासनाकडून त्यांना काय अपेक्षा आहेत, त्यांना काय हवं आहे, यावर सुद्धा विचारणा केली आहे, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली आहे.
पुण्यात भीतीचं वातावरण तयार झालं होतं. २०२३ पेक्षा २४ मध्ये गुन्हेगारी ५० टक्के कमी झाली आहे. कोयता गँग अशी काही अस्तित्वात नाही. ड्रग्स विक्रीवर कडक कारवाई झाली पाहिजे. काही गोष्टी घडल्या असतील अणि दादांनी त्यावर बोललं असेल तर त्यात काही गैर नाही.
अजितदादांनी ज्या सुचना दिल्या आहेत, त्या प्रशासनाने पाळल्या पाहिजेत. यात दादांचं सुद्धा मार्गदर्शन घेवू. जिथ चुका होतील तिथं करवाई केलीच पाहिजे. बालगुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांचा आणि मुलांचं समोपदेशन करू तशा सूचना दिल्या आहेत.
वाहतुकीसाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि डीसीपी देण्यात यावी असा प्रस्ताव पाठवला आहे. पुणे पोलीस दलात ८५९ नव्या जागा भरल्या जातील, अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे.