लोकअदालत मध्ये 66 अपील प्रकरणे मार्गी; हवेली प्रांत कार्यालयाचा उपक्रम…


हवेली : नागरिकांच्या हेलपाट्यांना काही प्रमाणात फुलस्टॉप लावण्यासाठी हवेली प्रांत कार्यालयाने लोकाभिमुख उपक्रम हाती घेतले आहेत. हवेली प्रांत अधिकारी डॉ. यशवंत माने व त्यांच्या टिमने मैरेथान सुनावणी घेत काही प्रकरणांमध्ये त्याचदिवशी निकाल आदेश पारीत केले आहेत. प्रांत कार्यालयाने लोक अदालतमध्ये 9 जूनला एकाच दिवसात 66 अपील अर्धन्यायीक प्रकरणे निर्गत केली आहेत.

डॉ. यशवंत माने यांच्या लोकअदालतील मास्टरस्ट्रोकने 66 प्रकरणांचा निपटारा झाला आहे. त्यातील काही प्रकरणांमध्ये आदेशही पारीत करून संबधिताना दिले आहेत. यामुळे हवेली प्रांत कार्यालयाच्या उपक्रमांचा थेट लाभ नागरिकांना होऊ लागल्याने महसूल लोक अदालत उपक्रम लोकाभिमुख होऊ लागला आहे.

महसूल अदालत मध्ये तुकडेबंदी व तुकडेजोड कायदयामधील तरतूदीचा भंग होऊन झालेले हस्तांतरण, कुळकायदा कलम 84 क स पात्र नमूद करून प्रदिर्घ कालावधी झालेले प्रकरणे, वारस नोंदीबाबतचे फेरफार, विविध अथॉरीटी चे दाखल शेरे कमी करणेबाबत, तसेच शासन पक्षकार असणारे अपिल, शेतरस्ता याबाबत दाखल असलेली अपिल प्रकरणे समाविष्ट करणेत आली होती. काही प्रकरणामध्ये त्याच दिवशी आदेश पारीत करून पक्षकारांना देण्यात आले आहेत.

नागरिकांच्या सोयीसाठी प्रस्तुतचे उपक्रम यापुढेही राबवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे काही प्रमाणात हेलपाटे थांबणार आहे. काही प्रकरणांत त्वरीत आदेशही दिले आहेत. निकालासाठी बंद केलेल्या प्रकरणांमध्ये प्राधान्याने निकाल देणार आहोत. ते निकाल जनतेसाठी www.eqjcourts.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
डॉ.यशवंत माने, उपविभागीय अधिकारी हवेली

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!