पोटच्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; ३५ वर्षीय वडिलांना अटक


लोणी काळभोर : वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला धक्का देणारी घटना लोणी काळभोर परिसरात उघडकीस आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलीशी लगट करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप समोर आला असून, या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपी वडिलांना अटक केली आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करीत असल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे मुलीला लज्जा उत्पन्न झाली. घडलेला प्रकार तिने आईला सांगितल्यानंतर आईने तत्काळ पोलिस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दाखल केली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सतीश गोडसे यांच्यासह पथकाला आरोपीला तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस हवालदार अण्णा माने, सूरज कुंभार आणि पोलिस अंमलदार सचिन सोनवणे यांच्या पथकाने कारवाई करून आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!