ग्राहकांचे हित बघत आहात, तसेच शेतकऱ्यांचेही हित बघा, कांद्याच्या दरावरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक…


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कांद्याचे भाव पडले असून उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी नाराज असून खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत सरकारकडे विनंती केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडून दिले की काय अशी शंका आता येत आहे. कांद्याच्या संदर्भातील आयात-निर्यात धोरणात सातत्याने धरसोडपणा करण्यात आला. यामुळे एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची पत घसरत आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे देशांतर्गत बाजारपेठेत देखील योग्य भाव मिळत नाही. अक्षरशः उत्पादन खर्च देखील निघत नाही अशी स्थिती आहे. कांदा हे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न देणारे पीक आहे. परंतु गेल्या काही वर्षांत कांद्याच्या दराने शेतकऱ्यांना रडविले आहे.

यामागे शासनाची धोरणे असून ग्राहकहित व शेतकरीहित या दोन्ही पातळ्यांवर समन्वय राखण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. माझी शासनाला नम्र विनंती आहे की कृपया आपण कांद्याच्या दरांबाबत आपण ग्राहकांचे हित सांभाळण्याचा पवित्रा घेत आहात पण त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी देखील आपण पुढाकार घेणे आवश्यक आहे.

अशी पोस्ट त्यांनी केली आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात सरकार याबाबत काय भूमिका घेणार यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की नाही हे लवकरच समजेल. याबाबत शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!