हवेलीत आता बंद यशवंत कारखान्याची निवडणूक ! सभासदांनी निवडणुकीसाठी 30 लाख केले जमा !!!!

पुणे: यशवंत सहकारी साखर कारखाना मर्यादित, चिंतामणीनगर, थेऊर च्या सर्व सभासदांनी ना परतावा स्वरूपात स्वेच्छेने १५ मे पर्यंत निवडणूक निधी जमा करण्याचे आवाहन प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय गोंदे यांनी केले होते.
असे असताना आता सभासदांनी 30 लाख रुपये जमा केले आहेत. कारखान्याच्या ११ मार्च रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांनी कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी ना परतावा म्हणून स्वेच्छेने वर्गणी स्वरूपात निवडणूक निधी जमा करण्याचा ठराव सर्वानुमते संमत केला होता.
आता निवडणूक देखील लवकरच लागण्याची शक्यता आहे. याबाबत सभासदांनी राज्य साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे 30 लाख रुपये जमा केले आहेत.
आता कारखाना कधी सुरू होणार याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कारखाना बंद आहे. यामुळे शेतकरी कारखाना सुरू करण्याची मागणी करत आहेत.