मुंबई लोकल ट्रेन साखळी बॉम्बस्फोटाला १७ वर्षे पूर्ण, आरोपींची फाशीची शिक्षा मात्र अजूनही…

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाला मंगळवारी १७ वर्षे पूर्ण झाली. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. यामुळे याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत.
असे असले तरी २०१५ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरलेल्या पाच जणांच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू व्हायची आहे. यामध्ये एकूण १२ जणांना कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले होते.
त्यापैकी ५ जणांना फाशीची तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यातील एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र हे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. यामुळे फाशी कधी दिली जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाद मागितली. त्याच वेळी, दोषींनी शिक्षेविरोधात अपील देखील दाखल केले. दोषींच्या याचिका नऊ वेगवेगळ्या खंडपीठांसमोर सुनावणीसाठी आल्या.
न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांनी या खटल्याच्या सुनावणीपासून स्वतःची माघार घेतली. तेव्हापासून हे प्रकरण अन्य कोणत्याही खंडपीठासमोर आलेले नाही.