मोठी बातमी! निसर्गाचा प्रकोप, मंदिर कोसळून 21 भाविकांचा मृत्यु, अनेकजण जखमी..


उत्तराखंड : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मंडीतील नागचला येथे ढगफुटी झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शिमल्यामध्ये अतिवृष्टीमुळे भुस्खलन आणि दरड कोसळली आहे. येथे भुस्खलन झाल्यामुळे शिव मंदिर कोसळले आहे. यात २१ जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली ५० भाविक अडकल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तराखंडमधील मालदेवता येथील देहरादून डिफेन्स कॉलेजची इमारत ढासळली आहे. मुसळधार पावसामुळे हवामान खात्याने सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.

तर शिमला, चंबा, कुल्लू, कांगड़ा, मंडी, लाहौल आणि स्पीति किन्नौर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शिवाय काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रदेशमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांना सुट्टी दिली आहे. तसेच राज्यातील एकूण ३०२ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले असून भूस्खलनानंतर २०० बसेस विविध ठिकाणी अडकून पडल्या आहेत. ११८४ ट्रान्सफॉर्मर्स बिघडले आहेत. जोरदार पावसामुळे अनेक भागांमधील वीज गेली आहे.

दरम्यान, त्याशिवाय सोलन जिल्ह्यातील कंडाघाटमधील जडोंनमध्ये ढगफुटी झाली असून यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर मंडी येथील नागचला येथे ढगफुटी झाल्यामुळे नाल्यातील पाणी हायवेवर आले आहे. त्यामुळे मंडी आणि कुल्लुचा संपर्क तुटला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!