महिलांनो मेकअप करताना काही नियम पाळणे अत्यावश्यक…


उरुळीकांचन : तुम्ही टिपिकल मानसिकतेतून कसे बाहेर पडता आणि स्वतःला कसं प्रेझेंट करता, यावर तुमचं सौंदर्य अवलंबून राहतं. तरीही मेकअप करताना काही बाबी लक्षात घ्यायला हव्यात….

ज्या वर्णावर कोणताही रंग खुलून दिसतो तो म्हणजे गहूवर्ण. विशेषत: गहूवर्णाला लाइट शेड चांगल्या दिसतात. बेज कलर, बिस्कीट कलरचा ड्रेस त्यांनी वापरावा. याच रंगांमध्ये लिपस्टिक, ब्लशऑन्स, आयशॅडोही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तसंच गहूवर्णीय मुलींना कॉपर रंगाच्या आयशॅडो फारच चांगल्या दिसतात.

यापेक्षा थोडा सावळा वर्ण असेल तर जांभळ्याकडे झुकणारा जो बर्गंडी रंग असतो त्या रंगात आयशॅडो छान दिसतात आणि ब्राऊन रंगाची लिपस्टिक. असं हे कॉपर, बर्गंडी आणि ब्राऊन कॉम्बिनेशन स्किनमध्ये छान मर्ज होतं. त्यामुळे मेकअपमध्ये पॅचेस जाणवत नाहीत. रंगांमध्ये एक फ्लो आल्यानं चेहरा छान ग्लो होतो.

सगळ्याच टोनच्या व्यक्तींनी हे लक्षात घ्यायला हवं की, केसांना कलर करण्याचा ” सध्याचा ट्रेंड असला तरीही केसांना केमिकल लावून केस लाल, पिवळ्या, हिरव्या रंगांनी शेड्स करून घेण्यापेक्षा मार्केटमध्ये रेडीमेड पॅच मिळतात आणि ते सोयीचेही आहेत. या पॅचेसच्या टोकाला अंगठ्या एवढी एक क्लिप असते. ती क्लीप केसांच्या मुळांशी टच करायची.

ती अतिशय पातळ असल्याने सप्लिमेंट जोडली आहे हेच कळत नाही आणि हेअरकलरची आपली हौसही पूर्ण होते. ऑड रंगांव्यतिरिक्त केसांच्याच रंगाचे ब्रॉड पॅचही मिळतात. यातही कर्ली, प्लेन असे आपल्या केसांच्या ठेवणीनुसार पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे केस भरदार, बाऊन्सी वाटतात आणि दिसायलाही छान दिसतात. थोडक्यात तुम्ही जे काही कराल, ते आत्मविश्वासाने कॅरी केलंत तर तुम्ही स्मार्ट व सुंदर दिसू शकाल..

काही वेगळ्या टीप्स : त्वचेचं तारुण्य जपण्यासाठी…

■ त्वचा सैल होऊ नये यासाठी जीवनसत्त्व क के, ई, अ, झिंक, सेलेनिअमसारखे घटक असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
■ आहारात मासे, सोयाबीन, काजू, यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
■ त्वचा टवटवीत आणि सतेज करण्यासाठी, त्वचेमधील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नये. फळांचा रसदेखील यासाठी चांगला फायदेशीर आहे. यामुळे फळाच्या रसाचे सेवनही केले पाहिजे.

■ त्वचेवर जमा होणाऱ्या मृत पेशी नियमितपणे काढणे आवश्यक आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि नवीन पेशींचे उत्पादन सुरू होते. ही प्रक्रिया त्वचा मजबूत ठेवण्यास मदत करते.
■ त्वचेचा संपर्क सूर्यप्रकाशातील अतिनील किरणाबरोबर आला तर, त्वचा काळी पडते. यामुळे सनस्क्रिन लावणे अनिवार्य आहे. सनस्क्रिन केवळ चेहऱ्यालाच नाही तर हाताला व मानेलाही लावणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!