शरद पवारांपेक्षा पार्थ पवार श्रीमंत, राज्यसभा खासदार अर्जावरून संपत्तीचा आकडा आला समोर, जाणून घ्या….


पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच आगामी राज्यसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील ७ जागांवरील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यंदा राज्यसभेवर पवार घराण्यातून आजोबा आणि नातू दोघे राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

शरद पवार हे महाविकास आघाडीकडून तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीकडून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या दोघांनी ६ मार्चला निवडणूक आयोगाकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यावेळी नियमाप्रमाणे या दोघांनी आपल्या संपत्तीचा तपशील असलेले प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले.

या प्रतिज्ञापवार नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार हे त्यांचे आजोबा शरद पवार यांच्यापेक्षा श्रीमंत असल्याचे दिसून येते. शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे एकूण ६० कोटी ७१ लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर पार्थ पवार यांच्या नावे एकूण ८८ कोटी ३३ लाख रुपयांची मालमत्ता आहे.

शरद पवार यांची संपत्ती….

जंगम मालमत्ता ४४ कोटी ७२ लाख रुपये, रोख रक्कम- १ लाख २५ हजार रुपये. बँका व वित्तसंस्थांमधील मुदत ठेवी – ११ कोटी ६६ लाख रुपये, समभाग, म्युचुअल्स फंड आदी- २७ कोटी रुपये. सोने व चांदीचे दागिने वस्तू- ३ कोटी ८५ लाख रुपये. स्थावर मालमत्ता- बारामतीतील शेती, घर, सदनिका आदी मालमत्तेचे सध्याचे अंदाजे मूल्य- १५ कोटी ९९ लाख रुपये . दायित्व- सुप्रिया एंटरप्रायजेसचे सुमारे ४९ लाख ८४ हजार रुपये दायित्व. एकूण मालमत्ता – ६० कोटी ७१ लाख रुपये.

पार्थ पवार यांची संपत्ती…

जंगम मालमत्ता- ११ कोटी ३५ लाख रुपये. बँका, टपाल विभाग, विमा व वित्तसंस्थामधील मुदत ठेवी ३ कोटी ६८ लाख रुपये . समभाग, म्युच्युअल फंडस आदी १ कोटी १७ लाख रुपये. सोने चांदीचे दागिने वस्तू १ कोटी ३१ लाख रुपये. स्थावर मालमत्ता- बारामती तालुक्यातील शेतजमिनी, पुण्यातील घर याचे सध्याचे अंदाजे मूल्य ७६ कोटी ९८ लाख रुपये. बँका किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज ९२ लाख ४८ हजार रुपये. एकूण मालमत्ता- ८८ कोटी ३३ लाख रुपये.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!