तक्रार मागे घ्या नाहीतर…!! दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला धमकी; चौघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल, पुण्यातील घटना…


पुणे : अश्लील शिवीगाळ करुन महिलेचा विनयभंग केला. तसेच वडगाव शेरी परिसरातून परत जात असताना चारकी गाडीतून आणि दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी भररस्त्यात गाडी अडवून जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना वडगाव शेरी आणि कल्याणी नगर येथील सार्वजनीक रोडवर शनिवार (ता.१९) ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी वानवडी येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन माधवराव नरहरे (वय. ६० रा. वडगाव शेरी), चारचाकी गाडी मधील अनोळखी दोन जण आणि दुचाकीवरुन आलेल्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नयसार, पीडित महिला मुलीला घेऊन वडगाव शेरी परिसरात गेल्या होत्या. त्यावेळी माधवराव नरहरे यांनी अश्लील शिवीगाळ करुन विनयभंग केला. त्यानंतर महिला मुलीला घेऊन त्यांच्या चारचाकी गाडीतून वानवडी येथे घरी जात होत्या.

त्यावेळी कल्याणीनगर येथील बिशप स्कुल मोरील सार्वजनिक रोडवर दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गाडीला चारचाकी आडवी लावून आडवले. तसेच महिलेच्या कार चालकाला शिवीगाळ केली. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी व्यक्तीने केलेली तक्रार मागे घे अन्यथा जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.

तसेच महिलेला शिवीगाळ करुन त्यांचे केस पकडून गाडीतून बाहेर काढत विनयभंग केला. यावेळी गाडीचे चालक महिलेला सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!