ऑनलाइन गेमिंगवर राज्य सरकार घालणार बंदी?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा…

पुणे : लहान मुलांपासून तरूणांपर्यंत अगदी सर्वांमध्ये ऑनलाईन गेमिंगची क्रेझ आहे. भारतातील अनेक युट्यूबर्स व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबवर ऑनलाईन गेमिंगची लाईव्ह स्ट्रिम करून पैसे कमावतात. एवढंच नाही तर भारतातील गेमर्स टूर्नामेंट आणि मॅचद्वारे देखील कमाई करतात.

पण आता या सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्रं फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकार महाराष्ट्रात ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. त्यामुळे अशी शक्यता आहे की, लवकरच महाराष्ट्रात ऑनलाईन गेमिंगवर बंदी घातली जाऊ शकते.
तरुणांचे व्यसन, वाढती गुन्हेगारी आणि विशेषतः रिअल-मनी जुगार याच सर्वांचा विचार करून आता महाराष्ट्रात ऑनलाईन गेमिंगवर बंदी घातली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकार ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत. प्रामुख्याने बेटिंग, जुगार आणि रिअल-मनी व्यवहारांशी संबंधित प्लॅटफॉर्मवर प्रथम बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात तरूणांमध्ये ऑनलाईन गेमिंगची चांगलीच क्रेझ आहे. तरूणांमध्ये ऑनलाईन गेमिंग खूप लोकप्रिय आहे. पण यामुळे मोठं नुकसानं देखील होत आहे. आजची तरूण पिढी ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेली आहे. यामुळे गुन्ह्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.