आज पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता खात्यात जमा होणार का?, महत्वाची माहिती आली समोर..


नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची प्रतिक्षा शेतकरी बांधव उत्सुकतेने करत आहेत. जुलै महिना अर्धा संपत आला तरीही अद्याप या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

दरवेळी प्रमाणे यावेळी देखील २००० रुपयांचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. मात्र यंदा केंद्र सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष १८ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील मोतिहारी येथील जाहीर कार्यक्रमाकडे लागलं आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ( ता.१८) मोतिहारी येथे विविध योजनांचा शुभारंभ करत आहेत. यामध्ये रस्ते, रेल्वे, आयटी, आणि प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ४०,००० लाभार्थ्यांना थेट आर्थिक मदतीचा समावेश आहे. त्यामुळेच या कार्यक्रमातच पीएम किसान योजनेच्या २० व्या हप्त्याची घोषणा होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

असे झाल्यास लवकरच २००० रुपयांची रक्कम थेट खात्यावर जमा होऊ शकते. मात्र पंतप्रधान कार्यालय किंवा कृषी मंत्रालयाकडून अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे ‘वेट अँड वॉच’ची भूमिका शेतकरी बांधवांनी घेण्याशिवाय पर्याय उरत नाही.

सामान्यतः पीएम किसान योजनेचा हप्ता बँक खात्यात जमा होण्याच्या एक दिवस आधी त्याची अधिकृत घोषणा केली जाते. मात्र, १७ जुलैपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही, त्यामुळे यंदा हप्ता उशिराने मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी १७ वा हप्ता १८ जून रोजी तर १९ वा हप्ता २४फेब्रुवारी २०२५ रोजी खात्यात जमा करण्यात आला होता. मात्र यंदा एक महिना उलटूनही 20 व्या हप्त्याबाबत अजून कोणतीही स्पष्टता नाही, त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!