क्रिती आणि प्रभास लवकरच उरकणार एंगेजमेंट ? त्या एका ट्विटमुळे चर्चांना उधाण…!

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनेन आणि ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर अली आहे. चित्रपट समीक्षक उमेर संधूने अलीकडेच एका ट्विटमध्ये दावा केला आहे की, क्रिती सेनन आणि प्रभास एंगेजमेंट करणार आहेत.
याचदरम्यान उमेर संधूने नुकतेच ट्विट केले, ‘ब्रेकिंग न्यूज, क्रिती सेनेन आणि प्रभास पुढील आठवड्यात मालदीवमध्ये एंगेजमेंट करणार आहेत. त्यांच्यासाठी खूप आनंद झाला मला.’ उमेर संधूच्या या ट्विटची सध्या बरीच चर्चा आहे. मात्र, या दाव्यात कितपत तथ्य आहे, याबाबत काहीही सांगणे कठीण आहे.
प्रभास आणि क्रिती पहिल्यांदाच ‘आदिपुरुष’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. दोघांनी एकाच चित्रपटात काम करायला सुरुवात केली तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरची चर्चा आहे. मात्र, काही काळापूर्वी क्रिती सेननने प्रभाससोबतच्या अफेअरच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या.
ती म्हणाली होती की, ना हे प्रेम आहे ना पीआर. प्रभासनेच एका मुलाखतीत डेटिंगच्या वृत्ताचे स्पष्ट खंडन केले होते. या सर्व जुन्या बातम्या असल्याचे त्यांनी सांगितले होते.
उमेर संधूच्या या दाव्यानंतर ट्विटर यूजर्सनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, काही वर्षांपूर्वी तुम्ही म्हणाला होता की प्रभास आणि अनुष्का जानेवारी २०१८ मध्ये लग्न करणार आहेत. एकाने लिहिले की, विचित्र गोष्ट म्हणजे फक्त क्रिती सेनन आणि प्रभास यांनाच या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नाही