अजित पवार होणार मुख्यमंत्री? सुनेत्रा पवार यांचे मोठं वक्तव्य, म्हणाल्या, पांडुरंग नक्कीच…


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री कधी होणार याबाबत अनेकदा चर्चा सुरू असते. अजित पवार यांनी अनेक पदे भूषवली, उपमुख्यमंत्री पदाचे तर त्यांनी रेकॉर्ड तोडले आहे. मात्र त्यांना मुख्यमंत्री होता आले नाही. अशातच त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी माध्यमांसमोर या विषयावर दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

त्या म्हणाल्या, पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतो, आपण सगळेच चांगल्या इच्छा आणि अपेक्षा बाळगत असतो. पण शेवटी काय द्यायचं, काय नाही हे देवाच्या हातात असतं. पांडुरंग नक्कीच सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करेल. असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार यांनी अनेक कार्यक्रमात थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती. मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय, असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली होती. यामुळे याची चर्चा झाली होती.

या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी याला आगामी राजकीय घडामोडींची नांदी मानलं. त्यात आता सुनेत्रा पवार यांची दिलेली ही भावनिक प्रतिक्रिया अजित पवारांच्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी देखील अनेकदा इच्छा व्यक्त केली आहे.

सध्या राजकीय स्थिती साशंक आहे. त्यामुळे अजित पवारांचा पुढील राजकीय निर्णय, सुनेत्रा पवारांचे सूचक विधान आणि आगामी विधानसभा निवडणुका यांचा परस्पर संबंध जोडला जातोय. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!