आमदाराच्या स्वीय सहायकाची पत्नी, तिच्यासाठी मंत्रालयातून फोन आले पण दवाखाना प्रशासनाला घाम फुटला नाही, पैशांअभावी झाला मृत्यू…

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा अनुभव थेट आमदारालाच आला. गेल्या अनेक वर्षांपासून लोक येथील रुग्णालयाच्या एकूण वागणुकी संदर्भात तक्रारी करतात, मात्र परिस्थिती जैसे थे. आता आमदाराच्या स्वीय सहाय्यकाची पत्नी केवळ पैशाच्या मागणीमुळे उपचार न केल्याने मरण पावली.
या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून या रुग्णालयात कोणाला माणुसकी आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी या रुग्णालयात हलगर्जीपणा झाला म्हणूनच तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार खुद्द भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केली आहे. रुग्णालयाने मात्र ही आमची बदनामी असून संपूर्ण माहिती एकांगीपणे सांगितली जात आहे,असे म्हटले.
तसेच आम्ही आमचा अहवाल सरकारला सादर करू असे सांगितले. आमदार गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे आहेत त्यांच्या पत्नी मोनाली भिसे यांना प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलने दहा लाख रुपये भरण्याची सूचना केली त्यावर भिसे कुटुंबीयांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली.
असे असताना सर्व प्रक्रियेला 20 लाख रुपये लागू शकतात अशावेळी तीन लाख रुपयांचे काय करायचे? असे सांगून उपचार करण्यास नकार दिला. नंतर आमदारांनी यंत्रणा हलवली, यानंतर मंत्रालयातून देखील दवाखान्याच्या प्रशासनाला फोन गेले. मात्र तरी देखील उपचार सुरू करण्यात आले नाहीत. त्यांना त्रास होत असल्याने दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी त्यांना जुळी मुले झाली मात्र अतिरक्तस्त्रावमुळे त्यांचे निधन झाले. यामुळे या रुग्णालय प्रशासनावर टीका केली जात असून असे अनेक प्रकार याठिकाणी समोर येत आहेत. यामुळे संताप व्यक्त केला जात असून खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील जर मंत्रालयातून फोन येऊन कोणी ऐकत नसेल तर सर्वसामान्य लोकांचे काय असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.