एक डझन आंबे म्हणजे 12 च का? याचा हिशोब कोणी लावला? जाणून घ्या महत्वाची माहिती…

पुणे : उन्हाळा सुरु आहे आणि हा आंब्याचा सिझन आहे. त्यात आंबा हा बहुतांश लोकांचा आवडीचा फळ आहे. त्यामुळे लोक तो विकत घेतातच. आंबा हा पेटी किंवा डझनवर विकला जातो. एक डझन, दोन डझन, अर्धा डजन वैगरे…
तसेच फक्त आंबाच नाही तर केळी, अंडी, बिस्किट, गरजे आपण डझनच्या भावाने विकत घेतो. आता अनेकांना या मोजमापाची सवय झाली आहे. त्यामुळे डझनमध्ये वस्तु घेताना आपल्याला काही वेगळं वाटत नाही.
पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की डझनमध्ये ते का मोजतात? त्याला किलोवर का मोजलं जात नाही? खरंतर हे संख्येचं कोडं खरंच रंजक आहे. डझन या संज्ञेचा उगम प्राचीन युरोपमध्ये झाला आहे. रोमन लोक १२ ह्या संख्येला “पूर्णांक” किंवा “पवित्र” मानत असत.
त्यांचं गणित १० ऐवजी १२ च्या बेसवर चालायचं. यालाच duodecimal system असं म्हणतात. १२ ही संख्या २, ३, ४ आणि ६ ने पूर्णपणे विभागली जाऊ शकते, त्यामुळे व्यवहारात ती सोयीची ठरते. जे व्यापाऱ्यांसाठी मोजणं सोपं करतं.
दरम्यान, मध्ययुगीन इंग्लंडमध्ये व्यापार करताना लोकांनी 12 वस्तूंचा एक गट करायला सुरुवात केली आणि त्यालाच डझन म्हणू लागले. मराठीत ‘डझन’ हे इंग्रजी ‘Dozen’ चं स्थानिक रूप आहे. आजही बाजारात “सव्वा डझन”, “दीड डझन” अशा शब्दप्रयोगांतून याचा वापर ऐकायला मिळतो.