स्वारगेट बलात्कार प्रकरणी 1 लाखांचे बक्षीस कोणाला मिळणार? 500 गावकरी शोध मोहिमेत, पण ‘या’ व्यक्तीला मिळणार 1 लाख रुपये…

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरूणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ माजली. याप्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गेल्या तीन दिवसांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवत त्याला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. आमचे सहमतीने संबंध, मी अत्याचार केला नाही. असा गौप्यस्फोट त्याने केला आहे. यामुळे पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दत्ता गाडेला शोधून देण्यासाठी जाहीर करण्यात आलेले बक्षीस कोणाला देणार याबद्दल स्पष्ट माहिती दिली.
ते म्हणाले, सर्वात शेवटची ज्यांच्या माहितीवरून आरोपीचा सुगावा लागला त्यांना एक लाखाचे बक्षीस देणार आहे, असे अमितेश कुमार यांनी सांगितले. लगेच त्यांनी, त्याचप्रमाणे गावासाठी काय करता येईल त्याचा देखील विचार करणार आहे, असं अमितेश कुमार म्हणाले आहेत.

दरम्यान, दत्ता गाडे गुरुवारी रात्री त्याचा नातेवाईक महेश बहीरट यांच्या घरी साडेदहा वाजता आला होता. याबाबत माहिती या नातेवाईकानेच पोलिसांना दिली. दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली. तो तिथून निघून गेला. त्यानंतर रात्री उशीरा पोलिसांनी या घराच्या परीसरात दत्ता गाडेचा शोध सुरु केला आणि त्याला अटक केली. आता सुरुवातीची माहिती देणाऱ्या महेश बहीरट यांच्या कुटुंबाला हे बक्षीस देणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या अटकेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या प्रकरणाचा खटका फास्टट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता पुढे काय माहिती समोर हे लवकरच समजणार आहे.