मुळशीमध्ये रिंगरोडच्या कडेच्या जमिनी कोणी लाटल्या? प्रवीण तरडे आक्रमक, मुळशी पॅटर्न 2 लवकरच येणार?


पुणे : सध्या अभिनेता प्रवीण तरडेंनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर केलेली एक पोस्ट भलतीच चर्चेत आली आहे. प्रवीण तरडेंनी मुळशीतल्या लाटलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर भाष्य केलं आहे. यामध्ये त्यांनी कुणाचं नाव घेतलेलं नसलं तरीसुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेत. त्यामुळे प्रेक्षकांना हीच मुळशी पॅटर्न 2’ची स्टोरी लाईन असल्याचं वाटतंय.

अनेकांनी सर, मुळशी पॅटर्न 2 असं म्हणत त्यांच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मुळशीमध्ये रिंगरोड आला. पण मागच्या 5 वर्षांत रोडच्या आजूबाजूला शेतजमिनी कोणी कोणी लाटल्या. सगळ्यांचा हिशोब होणार. मूळ मालक शेतकरीच, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रवीण तरडे यांनी मुळशीतल्या रिंग रोडवरच्या शेतजमिनीवरची पोस्ट शेअर करताना एक कॅप्शनही दिलंय. त्यात त्यांनी लिहिलंय, आता मोठ मोठे अंगावर येतील. पण पर्याय नाही शेवटी मुळशीकर आहे. बोलावं तर लागणारच.

काही दिवसांपूर्वी प्रवीण तरडे यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत माहिती दिलेली. मुळशी पॅटर्न 2 बद्दल बोलताना त्यांनी सांगितलेलं की, देऊळ बंद 2’नंतर शक्यतो मी ‘मुळशी पॅटर्न पार्ट 2’कडे वळेन. पहिल्या भागातून मी शेती विकायची नसते, ती जपायची असते हा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.

मुळशी पॅटर्न 2 मध्ये सर्वसामान्यांच्या आयुष्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. तुझ्या-माझ्या घराचं स्वप्न इतकं महाग का झालं? याचं उत्तर सिनेमातून मिळेल. असेही त्यांनी सांगितले होते. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!