उन्हाळ्यात दररोज काकडीचा रायता खाल्ल्यास काय होईल? तर ‘ही’ बातमी वाचाच…

cucumber raita : सध्या सगळीकडे कडक ऊन पडत आहे. या उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन केले पाहिजे. कारण उन्हाळ्यात थंड आणि हलके पदार्थ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
या दिवसांमध्ये शरीराचे तापमान वाढल्याने डिहायड्रेशन, अॅसिडिटी आणि पोटाच्या समस्या उद्भवतात. यामध्ये काकडीचा रायता हा एक उत्तम पर्याय आहे. तो शरीराला थंडावा देतो, पचन सुधारतो आणि त्वचेसाठीही लाभदायक ठरतो.
काकडीचा रायता असा तयार करा..
एका भांड्यात दही घ्या आणि त्यात चिरलेली काकडी टाका. त्यात मीठ, भाजलेले जिरे पावडर, काळी मिरी आणि बारीक चिरलेला पुदिना मिसळा. चांगले मिक्स करून त्यावर कोथिंबीर घाला. हा रायता केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.
काकडीचा रायता खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या..
वजन नियंत्रणास मदत
ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी काकडीचा रायता फायदेशीर ठरतो. त्यात कॅलरीज कमी असून फायबर जास्त असते, त्यामुळे भूक कमी लागते आणि वारंवार स्नॅक्स खाण्याची सवय नियंत्रणात राहते.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
उन्हाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होण्याची शक्यता असते. काकडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि नैसर्गिक चमक येते. याशिवाय, हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते, त्यामुळे मुरुम आणि पुरळ कमी होतात.
शरीराला थंडावा मिळतो
उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. काकडीत 90% पाणी असते, त्यामुळे शरीर आतून थंड राहते. उन्हात जास्त वेळ घालवल्यानंतर काकडीचा रायता खाल्ल्यास उष्माघात आणि डिहायड्रेशनपासून बचाव करता येतो.
पचनसंस्थेसाठी उपयुक्त
उन्हाळ्यात पचनाशी संबंधित समस्या जसे की आम्लता, बद्धकोष्ठता आणि गॅस होण्याची शक्यता जास्त असते. काकडीचा रायता हा या समस्यांवर एक उत्तम उपाय आहे. यात असलेले प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि पोट हलके ठेवतात. त्यामुळे पचनसंस्थेला मदत मिळते.