लक्षणं काय? काय टाळावे? चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीने महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर, परिस्थिती भयानक…

मुंबई : कोरोनानंतर चीनमध्ये एक नवा व्हायरल धुमाकूळ घालत असल्याची माहिती मिळत आहे. चीनमध्ये HMPV Virus नं अनेकांचे टेन्शन वाढलं आहे. या आजाराची साथच चीनमध्ये पसरल्याची माहिती अनेक माध्यमांनी दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
याच पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देश अलर्ट मोडवर आहेत. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करुन सर्दी-खोकला रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामुळे येणाऱ्या काळात काळजी घ्यावी लागणार आहे. याबाबत काही सूचना देण्यात आल्या आहेत.
यामध्ये आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेले असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये. खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावे. यामुळे संसर्ग लगेच पसरतो. टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावे.
तसेच साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सामान्य प्रकरणांमध्ये, यामुळे खोकला किंवा घरघर, वाहणारं नाक किंवा घसा खवखवणं होतो. लहान मुलं आणि वृद्धांमध्ये, एचएमपीव्ही संसर्ग गंभीर असू शकतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये गंभीर लक्षणं दिसू शकतात. यामुळे येणाऱ्या काळात काळजी घेणे आवश्यक आहे.