यंदा भाऊबीजेचा शुभ मुहूर्त कोणता? वाचा लाडक्या भाऊरायाला ओवाळण्याची शुभ वेळ आणि परंपरा…

पुणे : भाऊबीज हा सण भाऊ-बहिणींच्या पवित्र नात्याला समर्पित आहे. हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला साजरा होतो. अनेकदा दिवाळीनंतर लगेच गोवर्धन पूजा केली जाते आणि त्यानंतरच्या दिवशी भाऊबीज येते.

पण यावर्षी तिथींचा असा काही मेळ बसला आहे की भाऊबीज कधी आहे याबद्दल भाऊ-बहिणींमध्ये गोंधळ उडाला आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करुन त्याच्या दीर्घायुष्य आणि प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करते.

यंदा भाऊबीज कधी आहे? भाऊबीज साजरी करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती… यावर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी, ज्या दिवशी भाऊबीज आणि भ्रातृ द्वितीया साजरी केली जाते, ती दिवाळीनंतर दोन दिवसांनी येत आहे. म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी.

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला 23 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजून 16 वाजता सुरु होईल. तर, 23 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजून 46 मिनिटांनी हा मुहूर्त संपेल. त्यामुळे यंदा 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेचा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे भाऊरायाला ओवाळण्यासाठी पूजेची सर्वोत्तम वेळ ही दुपारी 1 वाजून 13 मिनिटं ते दुपारी 3 वाजून 28 मिनिटांपर्यंत असेल.
भाऊबीज हा सण हिंदू सणांमधील महत्त्वाचा सण मानला जातो. या सणाचे महत्त्व भाऊ आणि बहिणींमधील आदर आणि प्रेम व्यक्त करणे आहे. भाऊबीजेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला साजरी केली जाते. या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. त्यावेळी बहिणीने दाखविलेल्या आदराने प्रसन्न होऊन त्यांनी ऊ-बहिणी या दिवशी यमुनेत स्नान करून यमाची पूजा करतील असे वरदान दिले.
मृत्यूनंतर त्याला यमलोकात जावे लागणार नाही. याबद्दल अशी देखील मान्यता आहे की, नरकासुराचा वध करुन भगवान श्रीकृष्ण द्वारकेत परतले होते. यावेळी त्यांची बहीण सुभद्रा हिने त्यांचं फुले, मिठाई आणि दिवे लावून स्वागत केले होते. कपाळावर टिळा लावून दीर्घायुष्य प्राप्त होण्याची प्रार्थना केली होती.
