Pune News : पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? सामोश्यात कंडोम आता बर्फात मेलेला उंदीर
पुणे : पुण्यात पिंपरी चिंचवड येथे सामोशात कंडोम आणि दगड आढळला होता. हि घटना ताजी असताना आता बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे बर्फाची लादी विक्री करताना एका बर्फाच्या लादीत चक्क मेलेला उंदीर सापडला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून बर्फाचा वापर खूप वाढला आहे.
पण बर्फ बनवताना काही उत्पादक लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर या प्रकाराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. जरी खाद्यपदार्थांची शुद्धता तपासण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागावर असली तरी बर्फ बनवणाऱ्या कंपन्यांकडे या विभागाने पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आता कोणती कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.