Weather Update : शेतकऱ्यांनो सावध रहा! राज्यात अजूनही अवकाळीचे संकट कायम, जाणून घ्या…


Weather Update  : राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच शुक्रवारी (ता.१०) पुणे शहर आणि जिल्ह्यांत सर्वत्र पाऊस झाला. पुणे शहरात आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. दिवाळीच्या तयारीची लगबग सुरु असताना पुणे शहरात पाऊस झाला. पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. Weather Update

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसाचा फटका शेतात काढणीला आलेल्या शेती पिकांना बसणार आहे. Weather Update

परंतु रब्बी हंगामासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. पावसाचा फटका सातारा शहरासह ग्रामीण भागाला बसलेला पहायला मिळाला. दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली.

आता पुढील २४ तासांत पुन्हा अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी पाऊस झाला. पावसामुळे वातावणात बदल झाला आहे. अनेक शहराच्या तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान यवताळमध्ये नोंदवण्यात आले.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलीय. शुक्रवारी दुपारनंतर अचानक ढग दाटून आले. जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूरसह परिसरात जोरदार पाऊस कोसळलाय. राहाता तालुक्यातील लोणी परिसरातही जोरदार पाऊस आल्याने दिवाळीचे साहित्य विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यांसह नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!