Weather Update : राज्यात वादळी पावसाचा कहर सुरूच, याठिकाणी वादळी पावसाचा येलो अलर्ट, जाणून घ्या…

Weather Update : राज्यात अवकाळी पाऊस पाठ सोडत नसल्याचे दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने पुणे आणि इतर अनेक विजांच्या कडकडाटासह वादळी पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. अनेक भागांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता देखील वर्तविली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात २१, २२ आणि २३ एप्रिल हे तीन दिवस दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका पाऊस, गडगडाट आणि विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
यामध्ये प्रामुख्याने नाशिक, जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली या ११ जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाची तीव्रता अधिक असणार आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. Weather Update
दरम्यान, पुण्यातील आकाश ढगाळ आहे. तेथील तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. आर्द्रता पातळी देखील गडगडाटी ढग तयार होण्यासाठी अनुकूल आहे. सायंकाळी वादळी पावसाची शक्यता आहे.
राज्यात कमाल तापमान हंगामातील उच्चांकी पातळीवर पोचले आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस देखील हजेरी लावत आहे. अकोला येथे हंगामातील उच्चांकी म्हणजेच ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.