Weather Update : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! राज्यात अजून इतके दिवस पडणार पाऊस, पुणे वेधशाळेचा अंदाज..

Weather Update : राज्यातील वातावरणात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मोठा बदल झाला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही भागात ढगाळ हवामान आहे.
पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली सह कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. याबाबत पुणे वेधशाळेने महत्त्वाची माहिती दिली आहे. Weather Update
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या राज्यातील दक्षिण भागात पाऊस पडणार असा अंदाज आहे. राज्याच्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात १० नोव्हेंबर पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या हवामानातील बदलामुळे राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड यासह गोव्यात पाऊस पडणार आहे. याशिवाय आज अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव मध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उर्वरित राज्यात मात्र आज आणि उद्या हवामान कोरडे राहणार आहे. तसेच ११ तारखे नंतर संपूर्ण महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि विदर्भात थंडीचा जोर वाढेल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. Weather Update
तसेच दिवाळीच्या काळात राज्यातील किमान तापमानात दोन डिग्री घट येईल असा अंदाज आहे. एकंदरीत राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे तर परवापासून अवकाळी पाऊस विश्रांती घेणार असा अंदाज आहे.
दरम्यान, ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असल्याने हार्वेस्टिंगसाठी तयार झालेल्या शेती पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. झेंडू या फुल पिकाला देखील अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी बांधव चिंतेत आले आहेत. विशेष बाब म्हणजे हवामान खात्याने आणखी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस का बरसत आहे हा सवाल सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पडला आहे.