विश्वास नांगरे पाटील छावा बघून भावूक, म्हणाले महाराजांच्या डोळ्यांत धगधगत्या सळ्या खुपसल्या जातात, त्यांची जीभ खेचून…

मुंबई : राज्यासह देशात सध्या छावा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर बक्कल कमाई केली आहे. या चित्रपटात दाखवलेले चित्र बघून सर्वांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. यामुळे हा सिनेमा अजून अनेक दिवस चित्रपटगृहात चालणार आहे. प्रत्येकजण या सिनेमाचे भरभरुन कौतुक करत आहेत.
अनेकांनी हा चित्रपट बघितला आहे. सर्वसामान्य आणि राजकारणी व इतर क्षेत्रातील मान्यवरांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा छावा सिनेमाचे कौतुक केले होते. आता या सिनेमासाठी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनीही हा चित्रपट बघितला आहे.
चित्रपट बघून त्यांनी एक पोस्ट केली आहे. ते म्हणतात, ज़िंदा रहे.. काळजाला चिरत जातात या काव्यपंक्ती, ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यांत धगधगत्या सळ्या खुपसल्या जातात, त्यांची जीभ खेचून काढली जाते. सळसळतात धमन्या, ज्यावेळी त्यांच्या जखमांवर मीठ चोळले जाते! ‘मन के जीते जीत, मन के हारे हार , हार गये जो बिनलढे,उनपर हैं धिक्कार !’
केवढी उमेद केवढी प्रेरणा देणारे हे शब्द ! स्वतःला मैदानात भिडायची, लढायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुंझायची ऊर्जा देतात. हाथी घोडे, तोफ तलवारे, फौज तो ‘तेरी सारी हैं, पर जंजिरोंमे जकडा हुआ मेरा राजा अब भी सब पे भारी हैं !
आम्ही घ्यावा निर्भयपणा, आम्ही सोडावी लाचारी आणि गुलामगिरी, विचारांची आणि कृतींची आम्ही सोडावं स्वार्थी आणि घुस्मटलेलं जगणं, घ्यावी कणभर तरी आपल्याकडून जिद्द, करारी बाणा आणि महाराष्ट्र धर्म ! समतेचा, नीतिमत्तेचा शिकावा धडा ! राहावा मनोमनी चिंतावा क्षणोक्षणी, शेर शिवराज आणि त्यांचा छावा !जगदंब जगदंब! अशी पोस्ट त्यांनी केली आहे.