Viral News : अरे बापरे! महिला 3 महिने फक्त मासेच खात राहिली, शेवटी परिणाम पाहून डॉक्‍टरही झाले हैराण..


Viral News : एका महिलेने तीन महिने फक्त मासे खाल्ले आणि १५ किलो वजन कमी केलं असा दावा केला आहे. हे बघून तिचे डॉक्‍टरही थक्क झाले आहेत. या प्रकारची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, ही महिला फ्लोरिडाची रहिवासी आहे. जेन क्रुमेट असे तिचे नाव आहे. ती ६२ वर्षांची आहे. नुकतीच ती रिटायर झाली. काही महिन्यांपूर्वी तिचं वजन १०९ किलो होते. ती एवढी वैतागली होती की तिला चालता फिरताही येत नव्हतं. ती एका डॉक्‍टरांना भेटली. त्यांनी तिच्या खाण्या-पिण्यावर अनेक निर्बंध घातले. त्याचा तिला काहीच उपयोग झाला नाही.

जेन म्हणाली, ‘माझे पाय खूप दुखत असत. पायांवर सूजही आली होती. खूप भूक लागायची. त्यामुळे मी काहीही खात असे. मी वैतागले होते आणि वजनापुढे हात टेकले होते. त्याचवेळी मला डॉ. एनेट बोसवर्थ भेटली. ती डॉ. बोज म्हणून ओळखली जाते. तिने वजन कमी करण्यासाठी सांगितलेला उपाय आश्चर्यजनक होता. Viral News

तिने मला ‘फिश फास्ट’ ची आयडिया दिली. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? तर मी तीन महिने फक्त सार्डिन मासा खावा असं तिने मला सुचवलं. त्यामुळे वजन लवकर कमी होईल असंही ती म्हणाली. मला आधी हे जरा विचित्र वाटलं. पण तिने त्याचे फायदे सांगितल्यामुळे मी फिश फास्ट करुन बघायचं ठरवलं,’ असेही जेनने स्पष्ट केले आहे.

सार्डिन मासा खाल्ल्यामुळे अन्नाचं पचन लवकर होतं. बॉडी फॅटचं ज्वलन लवकर होतं आणि त्याचं उर्जेत रुपांतर होतं. डॉ. बोजने आपल्या युट्यूब चॅनलवर याबाबत माहिती दिली आहे. डॉ. बोजचा सल्ला ऐकून जेनने रोज सार्डिन मासा खायला सुरुवात केली.

हा एक तेलकट मासा आहे. तरीही जेन रोज चार डबे सार्डिन मासे खात असे. त्यामुळे तिला सुमारे १०० कॅलरी मिळत. या प्रयोगापूर्वी जेन रोज वजन करत असे. पण ते कमी होत नसे. सार्डिन मासे खायला सुरुवात केल्यानंतर दोन आठवड्यांतच तिला फरक जाणवण्यास सुरुवात झाली. तिचं सहा किलो वजन कमी झालं. तीन महिन्यात तिने चक्क १५ किलो वजन घटवले.

दरम्यान, सार्डिन हा अत्यंत गुणकारी मासा आहे. अमेरिकेत आजारी व्यक्तींना तो खाण्याचा सल्ला डॉक्‍टरांकडून दिला जातो. त्यात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स, प्रोटीन, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असतं. कॅलरीज कमी असतात. जेनचं वजन एवढ्या वेगाने कमी झालेलं बघून तिच्या डॉक्‍टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!