Vijay Kadam Death : मराठी सिनेसृष्टीवर शोककळा! विनोदवीर काळाच्या पडद्याआड, प्रख्यात अभिनेते विजय कदम यांचे निधन…

Vijay Kadam Death : मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. मराठी सिनेमा मालिका आणि रंगभूमी गाजवणारे हरहुन्नरी अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले आहे. विजय कदम यांच्या निधनामुळे मराठी सिनेविश्व आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
१९८० आणि ९० काळात एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केलं. पण त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
गेले काही दिवस ते कॅन्सर सारख्या आजाराची झुंज देत होते. पण त्यांच्यावरील उपचार यशस्वी ठरले. आणि अखेर आज त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. विजय कदम यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमी येथे आज दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. Vijay Kadam Death
विजय कदम यांच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलगा गंधार आहे. मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नी व मुलाने त्यांना खंबीर साथ दिली असे सांगितले होते. विजय कदम यांच्यावर चार किमोथेरपी आणि दोन सर्जरी झाल्या होत्या.