Vidhansabha Election 2024 : मोठी बातमी! आता राष्ट्रवादी अजित पवार गट जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक देखील लढवणार, उमेदवारांची यादी तयार…


Vidhansabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यापैकी जम्मू -काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेनंतर आता अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गट जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. जम्मू -काश्मीरमध्ये जवळपास २५ जागांवर अजित पवार गटाकडून उमेदवार उभे केले जाणार आहे. १० ते १५ उमेदवारांची नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही पुढील काही दिवासांमध्ये निवडणूक होणार आहे.

अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सध्या महायुतीमध्ये आहे. महाराष्ट्रात महायुतीमध्ये कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी आता जम्मू काश्मीरमध्ये देखील निवडणूक लढवणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!