Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू!! निवडणूक आयोग आज करणार तारखेची घोषणा…


Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यामुळे खऱ्या आर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.

या तारखांच्या घोषणेची प्रतीक्षा सर्व राजकीय पक्षांकडून उत्सुकतेने केली जात आहे. दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहे.

तसेच महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे, तर हरियाणा विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर रोजी संपेल. त्यामुळे या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी जोमात सुरू आहे. झारखंड विधानसभेची मुदत ४ जानेवारी २०२५ पर्यंत आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये २०२१४ नंतर पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २८८ जागांसाठी होणार असून, सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. झारखंडमध्ये ८१, हरियाणामध्ये ९०, आणि जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुका होणार आहेत, ज्यामध्ये विशेष लक्ष जम्मू-काश्मीरवर असणार आहे कारण २०१९ मध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर येथे पहिल्यांदाच निवडणूक होत आहे.

दरम्यान,दिवाळीच्या सणामुळे नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता अधिक आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. यंदा मतदान कधी होईल याची निश्चित घोषणा आज निवडणूक आयोग करणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!