Vidhansabha Election 2024 : मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, १८ सप्टेंबरपासून हरियाणा, जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक होणार…


Vidhansabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने १६ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यामध्ये निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे.

सन २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात ही पहिलीच निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. त्यानुसार, १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर ६ ऑक्टोबरला निकाल असणार आहे.

आम्ही अलीकडेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या ठिकाणच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. लोकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे. लोकांना निवडणुका व्हाव्यात अशी इच्छा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी जम्मू-काश्मीरमधील मतदान केंद्रावर लागलेल्या लांबलचक रांगा हा पुरावा आहे की, लोकांना केवळ बदल हवाच नाही तर त्या बदलाचा एक भाग बनून त्यांचा आवाजही उठवायचा आहे आणि लोकशाही दाखवते की, लोकांना त्यांचे नशीब स्वतःच लिहायचे आहे. Vidhansabha Election 2024

निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणतात की, हरियाणात दोन कोटींहून अधिक मतदार आहेत. ९० पैकी ७३ जागा सर्वसाधारण आहेत. हरियाणात २७ ऑगस्ट रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. हरियाणात २० हजार २६९ मतदान केंद्रे आहेत. हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला मतदान होणार असून ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!