Vidhan Parishad Election Result : फडणवीसांची रणनीती अखेर यशस्वी, शरद पवार यांना मोठा धक्का! पाठींबा दिल्येल्या उमेदवाराचा पराभव…


Vidhan Parishad Election Result  : विधानपरिषद निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय संघर्षाचा निकाल आज हाती आला आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उभे होते. त्यामुळे, कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.

त्यामध्ये, भाजपकडे संख्याबळ असल्याने भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास भाजप नेत्यांना होता. तर, महायुती म्हणूनही आमचे सर्वच 9 उमेदवार जिंकतील, असा दावाही भाजपच्या नेत्यांकडून केला जात होता. भाजपसह महायुतीच्या नेत्यांनाही या विजयाचा विश्वास होता. Vidhan Parishad Election Result

त्यानुसार, महायुतीच्या सर्वच ९ उमेदवारांचा विजय झाला आहे. तर, महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत.

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी उभे असलेल्या १२ उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजयी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे.

या निवडणुकीत काँग्रेसची ८ मतं फुटल्याचं प्रथमदर्शन दिसून येत आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भाजप महायुतीचा वरचष्मा दिसून आला.

विधानपरिषदेच्या ११ विजयी उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे..

भाजपचे विजयी उमदेवार

१) योगेश टिळेकर
२) पंकजा मुंडे
३)परिणय फुके
४) अमित गोरखे
५) सदाभाऊ खोत

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार

६) भावना गवळी
७) कृपाल तुमाने

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार

८) राजेश विटेकर
९) शिवाजीराव गर्जे

काँग्रेस विजयी उमेदवार

१०) प्रज्ञा सातव

शिवसेना ठाकरे गट

११) मिलिंद नार्वेकर

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!