ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन; वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..


मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. गेली कित्येक वर्षे त्या मूत्रिपडाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातू असा परिवार आहे. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर येताच इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

आशा नाडकर्णी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब १९५७ ला मुंबई मध्ये रहावयास आले आणि तेव्हा पासून त्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. त्या उत्तम नर्तिका देखील होत्या. १९५७ ते १९७३ ह्या कालावधीत त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपट केले.

आशा यांनी ‘मौसी’ चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यावेळी त्या अवघ्या १५ वर्षांच्या होत्या. त्यांना अभिनय क्षेत्रात प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी आणले. त्यांनीच आशा यांना ‘वंदना’ या चित्रपटात संधी दिली.यानंतर आशा यांनी ‘नवरंग’सह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!