ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं निधन ; वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीवर शोककळा..


पुणे: ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांची किडनी निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे.त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.त्यांचे मित्र अशोक पंडित यांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली.

अभिनेते सतीश शहा बऱ्याच काळापासून किडनीच्या संबंधित आजाराने ग्रस्त होते. तसेच त्यांची किडनी स्ट्रांन्सप्लांटही झाल्याचं बोललं जातं,आणि त्यातूनच त्यांना इन्फेक्शन झाले होते. तर काहींच्या मते त्यांची किडनीच निकामी झाल्यामुळे त्यांचा त्रास वाढला आणि त्यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनानंतर चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगातील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

सतीश शाह हे हरहुन्नरी अभिनेते होते. आपल्या अनोख्या टायमिंगसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी 250च्यावर हिंदी चित्रपटात काम केलं. टीव्ही सीरिअल आणि मराठी सिनेमातही त्यांनी काम केलं होतं. गंमत जंमत या मराठी सिनेमातील त्यांची पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका संस्मरणीय ठरली होती.मैं हूं ना, कल हो ना हो, फना, ओम शांति ओम, हम आपके हैं कौन आणि जाने भी दो यारों सारख्या सिनेमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्याच्या निधनाने चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!