Vasant More : पुण्यात कुठल्या पक्षाकडून लढणार? वसंत मोरे यांनी दिले मोठे संकेत, घेतलं ‘या’ पक्षाचे नाव…


Vasant More : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले नेते वसंत मोरे यांनी मोठा दावा केला आहे. पुण्यात महाविकास आघाडीचाच विजय होईल, असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.

तसे “पुण्यात महाविकास आघाडीकडून मला संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे, असं देखील वसंत मोरे म्हणाले आहेत. कदाचित महाविकास आघाडीच्या दुसऱ्या यादीत पुण्याचं नाव असेल, असं वसंत मोरे म्हणाले आहेत. महाविकास आघाडीचं आताचं वातावरण पुणेच नाही, तर पूर्ण महाराष्ट्रात आहे. मला वाटतं की महाविकास आघाडी जिंकून येऊ शकते, असे वसंत मोरे म्हणाले आहे.

वसंत मोरे पूढे म्हणाले की, ऑलरेडी मी लंगोट लावलेलं आहे. मी लंगोट लावून मैदानात उतरलो आहे. फक्त आता मला कोणत्या दिशेने कोणता डाव टाकायचा ते मी थोड्या दिवसांत ठरवेल. मला शंभर टक्के भाजपला चितपट करायचं आहे, अशी भूमिका वसंत मोरे यांनी मांडली. Vasant More

मला वाटतं की, महाविकास आघाडीच्या दुसऱ्या यादीत आपल्या पुण्याचा विचार होऊ शकतो”, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली. मनसेच्या प्रश्नावर मी उत्तर देऊ शकत नाही. पक्ष संघटना आहे, पक्षाचे नेते आहेत, पुण्यातील मनसेच्या नेत्यांना याबाबत विचारावं. ते नेते त्याबाबत उत्तर देतील”, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!