वाल्मिक कराडने जिल्हाधिकारी कार्यालयात मारले, करुणा मुंडेंचा धक्कादायक गाैप्यस्फोट…

बीड : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राकारण ढवळून निघालं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला खंडणी आणि संतोष देशमुख हत्येशी या खंडणीचा संबंध असल्याच्या संशयावर अटक झाली आहे. शिवाय त्याच्या मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
पण आता मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. धंनजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपले पती धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत.
करुणा मुंडे यांनी एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी म्हटले आहे, माझ्या नवऱ्याने मला जिवंत गाडले असते तरी चालले असते, पण एक दोन कवडीच्या गुंडानी मला माझ्या नवऱ्यासमोर मारले. तसेच वाल्मिक कराडने आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण केली. पण धंनजय मुंडे आणि पोलिसांकडून त्यांना मदतीची अपेक्षा असताना त्यांनी काहीच मदत केली नाही, असा दावाही करुणा मुंडे यांनी केला आहे.
दरम्यान,त्याचबरोबर करुणा मुंडे यांनी थेट हायकोर्टात धाव घेत धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप होता. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप केला होता. दरम्यान करुणा मुंडे तुमच्या सौभाग्यवती आहेत. त्या पहिल्या पत्नी आहेत, असे मी जबाबदारीने सांगतो. असा गौप्यस्फोट आमदार सुरेश धस यांनी केला आहे.