उरुळीकांचन हादरलं! विषारी दारूचा मृत्यूचा सापळा इथूनच? पुणे–पिंपरीनंतर स्थानिक तरुण बळी, भेसळ रॅकेटचा धक्कादायक संशय!


उरुळीकांचन : पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारुने २२ जणांचा बळी गेल्यानंतर उरुळीकांचन येथील दारुभट्टीतून उत्पादीत होऊन विक्रीसाठी गुत्यावर गेलेल्या विषारी दारुने उरुळीकांचन येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विषारू दारुने मृत्यूमुखी पडलेला तरुण एका खाजगी दवाखान्यात शुक्रवार( दि.२९) रोजी सकाळपासून उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली असून खाजगीरुग्णालयात सूत्रांनी विषारी दारू सेवणाने रुग्णाचा मृत्यू झाल्याचीपुष्टी दिली असून विषाणू दारु पुरवठ्याचे भेसळाचे उगमस्थान उरुळीकांचन येथून घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विषारी हातभट्टी दारुसेवणाने २२ जणांचा मृत्यूचा आकडा गाठल्यानंतर शहरात मुख्य दारू पुरठ्याचा स्त्रोत असलेल्या उरुळीकांचन येथेच एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजू उमेश अवचरे (वय -३८,रा.पांढरस्थळ , उरुळीकांचन) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो तरुण शुक्रवारी सकाळपासून उलट्या, पोटदुखी , मळमळ व स्मृतीभंश आदी लक्षणे आढळून खाजगी दवाखान्यात दाखल झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात विषारु दारुच्या घडलेल्या हत्याकांडात उरुळीकांचन शहरातून पुरवठा होणाऱ्या हातभट्टी दारुचा पुरवठा असल्याचा संशय व्यक्त होत होता. आता स्थानिक गुत्यावर तरुणाचा मृत्यू झाल्याने हे भेसळकांड उरुळीकांचन येथूनच घडले असल्याचा दाट संशय आहे. कारण उरुळीकांचन येथूनच पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात दारुचा अनेक वर्षे पुरवठा आहे. या ठिकाणाहूनच स्पिरीट व इथेनॉल सारखा पदार्थ दारुत मिसळला का अशी शंका उपस्थित होत आहे. दरम्यान या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आल्याची चर्चा असून या रॅकेट चालविणाऱ्या मुख्य
ठिकाणी प्रशासन कारवाई करणार का, म्हणून विचारणा होऊ लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!