Uruli Kanchan News : कचऱ्याच्या दुर्गंधीसाठी बारा वर्षाची मुलगी करणार उपोषण, कुंजीरवाडी कचरा डेपो आंदोलनासाठी करणार ग्रामस्थही आक्रमक..!!


Uruli Kanchan News : उरुळीकांचन : पुणे -सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी (ता.हवेली ) येथील ग्रामपंचायतीच्या गावठाण हद्दीत व हजारो विद्यार्थी संख्या असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांलगत असणाऱ्या कचराडेपोने विद्यार्थी व शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याने आता गावातीलच एका १२ वर्षाच्या मुलीने या प्रश्नावर गांधीगिरी मार्गाने उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतल्याने या आंदोलनाने कचरा डेपो हटविण्यासाठी ‘शहाण्यांना शब्दांचा मार ‘ या तत्वाने ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी शहरीकरणाने वाढत असलेल्या कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या कचरा साठवणूकीसाठी ग्रामपंचायतीने अनेक वर्षांपासून गावठाण हद्दीत कचरा डेपो अस्तित्वात आहे. मात्र हा कचरा डेपो दिवसेंदिवस व्यापक बनू चालल्याने कचरा विल्हेवाटाची मोठी समस्या उत्पन्न झाली आहे. Uruli Kanchan News

या कचरा डेपोत ओला, सुका कचऱ्यासह अन्नपदार्थ, हॉटेल व सभारंभातील दुर्गंधी उत्पन्न करणारा कचरा सर्रास या ठिकाणी टाकला जात असल्याने मोठ्या प्रमाणात या दुर्गंधी उत्पन्न होत आहे. मात्र या कचराडेपोतील ओला, सुका कचऱ्याचे विघटन करण्याची प्रक्रिया या ठिकाणी नसल्याने सर्व दुर्गंधीयुक्त कचरा उघड्यावर पडत असल्याने या दुर्गंधीने गावठाण व शाळांलगत विद्यार्थी व ग्रामस्थांपर्यंत दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संसंर्ग आजाराची लक्षणे फोफावत आहे.

या कचराडेपोला काही भागात भिंतीचे संरक्षण नसल्याने काही ग्रामस्थ कचऱ्याच्या पिशव्या फेकणे, या ठिकाणी मेलेली जनावरे टाकणे तसेच जणावरांनी कचऱ्याची अस्ताव्यस्त करणे तसेच जळाऊ कचऱ्याने आगीच्या लोटातून दुर्गंधी पसरणे इ. नित्याचीच बाब ठरत आहे. त्यामुळे गावठाणातील ग्रामस्थ् व लगतच्या हाकेच्या अंतरावर शाळांतील विद्यार्थ्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. हजारो विद्यार्थी या दुर्गंधीत शिक्षणाचे धडे घेत आहेत. मात्र त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.

या कचराडेपोच्या हस्तांतरणाची आक्रमक मागणी अनेक वर्षे या ठिकाणी होत आहे. मात्र हि समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीची इच्छाशक्ती नसल्याने नागरीकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा होत आहे. अनेक वर्षे ही समस्या सुटण्यासाठी ठोस पाऊले ग्रामपंचायत उचलत नसल्याने ग्रामस्थांनी गुडगे टेकले आहेत.

ग्रामस्थांनी स्वच्छता व आरोग्याचे फलक लावून जनजागृती करण्याचे प्रयत्न करुन ग्रामपंचायतीने कचरा डेपो हस्तांतरण करण्याचा ठोस उपाय न केल्याने या मागणीला आता गावातीलच एका १२ वर्षीय शाळकरी मुलीने गांधीगिरी उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गांधीगिरी आंदोलनाने ग्रामपंचायतीला शहानपन सुचणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खरेतर कचरा कोणीच करू नये तसेच झालेल्या कचऱ्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे परंतु या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो व त्याचा त्रास आम्हाला होतो त्यामुळे मी उपोषणाला बसण्याचे ठरविले आहे.

आदिती सावंत (विद्यार्थिनी)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!